• ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मरिन अव्वल मानांकित ताई त्झू-यिंगवर विजय मिळवत योनेक्स थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा (Yonex Thailand Open Badminton Tournament) २०२१ मध्ये महिला एकेरीची विजेती बनली आहे.

ठळक मुद्दे

  • योनेक्स थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा ही बॅडमिंटन जागतिक संघटनेमार्फत (Badminton World Federation - BWF) २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेली ही पहिली बॅडमिंटन स्पर्धा होती.

एकेरी शीर्षक विजेते

  • पुरुष श्रेणी: विक्टर अ‍ॅक्सलसेन (डेन्मार्क)

  • महिला श्रेणी: कॅरोलिना मरिन (स्पेन)

दुहेरी शीर्षक विजेते

  • पुरुष श्रेणी: ली यांग आणि वांग ची-लिन (तैवान)

  • महिला श्रेणी: ग्रीसिया पोली आणि अप्रियानी रहायू (इंडोनेशिया)

मिश्र दुहेरीचे विजेते

  • डेचापोल पुवावरुणोक्रोह आणि सप्सीरी तरात्तानाचाई (थायलंड)

BWF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: BWF म्हणजेच Badminton World Federation अर्थात बॅडमिंटन जागतिक महासंघ होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: क्वालालंपूर, मलेशिया हे BWF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १९३४ साली BWF ची स्थापना करण्यात आली होती.

  • अध्यक्ष: पूल-एरिक होयर लार्सन हे BWF चे सध्याचे अध्यक्ष आहेत.