-
गेल्या वर्षी वुशू जागतिक चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेले रौप्य पदक सुवर्णपदकात वर्धित झाल्यानंतर भारतीय पोलिस अधिकारी पूनम खत्री यांना वर्ल्ड चॅम्पियनशिपचा दर्जा प्राप्त झाला आहे.
ठळक मुद्दे
-
महिलांच्या ७५ किलो वजनी गटात पूनमने इराणची प्रतिस्पर्धी मरियम विरुद्धचा अंतिम सामना गमावला होता.
-
मात्र अलिकडेच मरियम डोपिंग चाचणीमध्ये दोषी ठरल्यानंतर पूनम खत्री यांना सुवर्णपदक देण्यात आले आहे.
-
भारतीय वुशु संघटनेचे सरचिटणीस सुहेल अहमद यांनी सदर माहितीची पुष्टी केली.
आंतरराष्ट्रीय वुशु संघटनेबाबत (International Wushu Federation) महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९९० साली याची स्थापना झाली होती.
-
अध्यक्ष: झोंगवेन गौ हे सध्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: बीजिंग, चीन येथे याचे मुख्यालय आहे.
-
सदस्य देश: १५२ देश आंतरराष्ट्रीय वुशु संघटनेचे सदस्य आहेत.