-
जागतिक स्क्वॉश संघटनेच्या (World Squash Federation - WSF) अध्यक्षपदी इंग्लंडच्या झेना वूल्ड्रिज यांची निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
१९६७ मध्ये संघटनेची स्थापना झाल्यापासून सेवा देणार्या त्या १० व्या अध्यक्षा ठरणार आहेत.
-
न्यूझीलंडच्या सुसी सिमकॉक यांच्यानंतर त्या दुसर्या महिला अध्यक्ष बनणार आहेत.
-
संघटनेचे मावळते अध्यक्ष फ्रान्सचे जॅक फोंटेन यांची जागा त्या घेतील.
WSF बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: WSF म्हणजेच World Squash Federation अर्थात जागतिक स्क्वॉश संघटना होय.
-
सध्याचे अध्यक्ष: जॅक फोंटेन हे सध्या संघटनेच्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १९६७ साली जागतिक स्क्वॉश संघटनेची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: हेस्टिंग्ज, युनायटेड किंगडम हे सदर संघटनेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सदस्यत्व: १४९ राष्ट्रीय संघटना या जागतिक स्क्वॉश संघटनेच्या सदस्य आहेत.