-
जून २०२१ ते जून २०२४ या कालावधीसाठी रणजितसिंह डिसले यांची जागतिक बँकेच्या शिक्षण सल्लागार पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
२०२० मध्ये 'ग्लोबल टीचर अॅवॉर्ड' मिळालेले ते पहिले भारतीय असून आता जागतिक बँकेने सुरू केलेल्या कोच प्रकल्पात ते काम करणार आहे.
-
शिक्षकांच्या व्यावसायिक विकासात सुधारणा करून देशांना शिक्षणास गती देण्यास मदत करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
जागतिक बँकेबाबत (World Bank) महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९४४ साली जागतिक बँकेची स्थापना झाली होती.
-
अध्यक्षः डेव्हिड रॉबर्ट मालपास हे सध्या जागतिक बँकेच्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका हे World Bank च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.