-
भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधूने नुकतेच टोकियो ऑलिम्पिक महिला एकेरी स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले आहे.
ठळक मुद्दे
-
चीनच्या ही बिंगजियाओला पराभूत करून तिने या पदकावर आपले नाव कोरले आहे.
-
सदर विजयासह वैयक्तिक स्पर्धांमध्ये २ ऑलिम्पिक पदके जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला आणि केवळ दुसरी भारतीय अॅथलीट बनली आहे.
-
२०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक पटकाविले होते.
-
२०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे दुसरे पदक ठरले आहे. यापूर्वी मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकले आहे.