-
पुरुष गटात नोवाक जोकोविचने अंतिम सामन्यात मॅट्टेओ बेरेटेटिनीचा पराभव करून आपले ६ वे विम्बल्डन विजेतेपद तसेच २० वा ग्रँड स्लॅम करंडक जिंकला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर विजयासह त्याने पुरुषांच्या एकेरीच्या एकूण जेतेपदाबाबत रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्याशी बरोबरी साधली आहे.
-
महिला गटात ऑस्ट्रेलियाच्या अॅशलेह बार्टीने करोलिना प्लिस्कोवाला पराभूत करत पहिले विम्बल्डन महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले आहे.
विजेत्यांची यादी
-
१. पुरुष एकेरी (Men’s Singles): नोवाक जोकोविच (सर्बिया)
-
२. महिला एकेरी (Women’s Singles): अॅशलेह बार्टी (ऑस्ट्रेलिया)
-
३. पुरुष दुहेरी (Men’s Doubles): निकोला मेक्टिक आणि मेट पेव्हिए
-
४. महिला दुहेरी (Women’s Doubles): हिसिए सु-वेई आणि एलिस मर्टेन्स
-
५. मिश्र दुहेरी (Mixed Doubles): नील स्कूप्सकी आणि डिजायरा क्रॅव्हझिक