-
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनमार्फत (Federation of Automobile Dealers Associations - FADA) सन २०२०-२२ साठी विंकेश गुलाटी यांची ३५ वे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
FADA चे नूतन अध्यक्ष या नात्याने ते आशिष हर्षराज काळे यांचे उत्तराधिकारी बनतील.
-
श्री. गुलाटी सध्या अलाहाबाद व फरीदाबादच्या बाहेर असलेल्या युनायटेड ऑटोमोबाईल्सचे (United Automobiles) संचालक म्हणून कार्यरत आहेत.
-
१९८५ पासून युनायटेड ऑटोमोबाईल्स हे ऑटो डीलरशीप व्यवसायात सामील झाले आहेत.
-
महिंद्रा अँड महिंद्रा तसेच बजाज ऑटो यांसारख्या ब्रँडचे डीलर म्हणून ते प्रसिद्ध आहेत.
FADA बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: FADA म्हणजेच Federation of Automobile Dealers Associations अर्थात ऑटोमोबाईल डीलर्स संघटना होय.
-
स्थापना वर्ष: १९६४ साली FADA ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे FADA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.