-
रेल्वे मंडळाचे विद्यमान अध्यक्ष व्ही.के. यादव यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer - CEO) म्हणून नियुक्ती करण्यास मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने रेल्वे बोर्डाच्या पुनर्रचनेस मान्यता दिली आहे.
-
राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात केलेल्या सुधारणांचा एक भाग म्हणून भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (Indian Railway Management Service - IRMS) नावाच्या एकल मध्यवर्ती सेवेमध्ये रेल्वेशी संबंधित ८ विभाग विलीन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
-
सदर सुधारणांमुळे रेल्वेमधील विभागीयवाद संपुष्टात येईल, रेल्वेच्या कामांना चालना मिळेल, निर्णय घेण्यास वेग येईल, सुसंगत दृष्टी निर्माण होईल आणि तर्कसंगत निर्णय घेण्यास प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.
-
भारतीय रेल्वे वैद्यकीय सेवेचे (Indian Railway Medical Service - IRMS) नाव बदलून भारतीय रेल्वे आरोग्य सेवा (Indian Railway Health Service - IRHS) असे करण्यात येणार आहे.
भारतीय रेल्वेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: ८ मे १८४५ रोजी भारतीय रेल्वेची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे भारतीय रेल्वेचे मुख्यालय आहे.
-
रेल्वेमंत्री: पीयूष गोयल हे सध्या रेल्वेमंत्री म्हणून कार्यरत आहेत.
-
रेल्वे राज्यमंत्री: सुरेश अंगडी हे सध्या रेल्वे राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.
-
रेल्वे बोर्ड अध्यक्ष: विनोदकुमार यादव हे सध्या रेल्वे बोर्ड अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
-
विभागणी: १८ झोनमध्ये भारतीय रेल्वेची विभागणी करण्यात आली आहे.