• संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी मायकेल ब्लूमबर्ग यांना हवामान महत्वाकांक्षा व समाधानावरील (Climate Ambition and Solutions) विशेष दूत म्हणून पुनर्नियुक्त केले आहे.

ठळक मुद्दे

  • यापूर्वी मार्च २०१८ ते नोव्हेंबर २०१९ कालावधी दरम्यान हवामान कृतीसाठी संयुक्त राष्ट्रांचे विशेष दूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.