-
संयुक्त राष्ट्रांच्या भांडवल विकास निधीच्या (United Nations Capital Development Fund) प्रमुखपदी भारतीय वंशाच्या गुंतवणूक आणि विकास बँकर प्रीती सिन्हा यांची कार्यकारी सचिव (Executive Secretary) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
कार्यकारी सचिव हे संस्थेतील सर्वोच्च नेतृत्व पद आहे.
-
त्या जुडिथ कार्ल यांची जागा घेतील.
-
त्या समाजातील महिला, तरुण, लघु आणि मध्यम उद्योगांना सूक्ष्म वित्त सहाय्य करण्यावर लक्ष केंद्रित करून कार्य करतील अशी अपेक्षा आहे.
UN बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.
-
स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.
-
सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.