• बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याची युनिसेफमार्फत (United Nations Children’s Fund - UNICEF) मुलांच्या हक्कांसाठीच्या 'प्रत्येक मुलासाठी (For Every Child)' या मोहीमेकरिता नेमणूक करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • आयुष्मान भारतामध्ये मुलांच्या हक्कांबाबतच्या या उपक्रमासाठी काम करेल.

  • मुलांवर होणारा हिंसाचार संपविण्यासाठी युनिसेफला पाठिंबा देण्यासाठी तो प्रयत्नशील राहील.

युनिसेफबाबत (UNICEF) महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UNICEF म्हणजेच United Nations International Children's Emergency Fund अर्थात संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय मुलांचा आपत्कालीन निधी होय.

  • कार्यकारी संचालक: हेनरीटा एच. फोर सध्या UNICEF च्या कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: ११ डिसेंबर १९४६ रोजी UNICEF ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UNICEF चे मुख्यालयाचे ठिकाण आहे.