• संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (United Nations Environment Programme - UNEP) - तुंझा इको-जनरेशन (Tunza Eco-Generation) द्वारे खुशी चिंदलिया या १७ वर्षीय मुलीची भारतासाठी प्रादेशिक राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • आपल्या या नव्या भूमिकेत खुशी हवामान बदल आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व आणि पर्यावरणीय खजिन्याचे संरक्षण करण्याची गरज याबद्दल जनजागृती करेल अशी अपेक्षा आहे.

  • फेब्रुवारी २०२१ पर्यंत विविध पर्यावरण जागरूकता कार्यक्रमांवर ती काम करणार आहे.

संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाबाबत (UNEP) महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UNEP म्हणजेच United Nations Environment Programme अर्थात संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम होय.

  • स्थापना वर्ष: ५ जून १९७२ रोजी UNEP ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नैरोबी, केनिया हे UNEP च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • कार्यकारी संचालक: इनगर अँडरसन हे सध्या UNEP च्या कार्यकारी संचालक पदावर विराजमान आहेत.