• पटियाला येथील फेडरेशन चषक ज्येष्ठ राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत (Federation Cup Senior National Athletics Championships) महिलांच्या १०० मीटर फायनलमध्ये एस. धनलक्ष्मीने दुती चंदचा पराभव करत सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे.

ठळक मुद्दे 

  • तमिळनाडूच्या २२ वर्षीय धनलक्ष्मीने ११.३९ सेकंदाचा वेळ नोंदवत स्पर्धेतील वेगवान महिला बनण्याचा मान मिळवला.

  • ओडिशा येथील दुती चंद ११.५८ सेकंदाच्या वेळेसह दुसर्‍या स्थानावर विराजमान झाली आहे.

  • तमिळनाडूची धावपटू अर्चना सुसेंद्रन तिसऱ्या स्थानावर विराजमान झाली.

  • चुकीची सुरुवात झाल्यानंतर हिमा दास अपात्र ठरली.

  • पुरुषांच्या १०० मीटर अंतिम प्रकारात पंजाबच्या गुरिंद्रवीर सिंगने १०.३२ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले.

  • तमिळनाडूचा इलाक्कियादासन कन्नड (१०.४३) आणि महाराष्ट्राचा सतीश कृष्णकुमार (१०.५६) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाले.