-
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे (National Highways Authority of India - NHAI) अध्यक्ष म्हणून सुखबीरसिंग संधू यांना ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
संधू यांच्या प्रतिनियुक्तीच्या कालावधीत २१ जानेवारी २०२१ नंतर २१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत मान्यता देण्यात आली आहे.
-
संधू हे १९८८ सालच्या बॅचचे उत्तराखंड केडरचे IAS अधिकारी आहेत.
NHAI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: NHAI म्हणजेच National Highways Authority of India अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण होय.
-
स्थापना वर्ष: १९९५ साली NHAI ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे NHAI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सध्याचे अध्यक्ष: सुखबीरसिंग संधू हे सध्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
-
उद्दिष्ट: राष्ट्रीय महामार्गांचा विकास व देखभाल करणे हे NHAI चे महत्वपूर्ण उद्दिष्ट आहे.
-
ब्रीदवाक्य: 'Not just Roads, building a Nation' हे NHAI चे ब्रीदवाक्य आहे.