• RBI चे माजी डेप्युटी गव्हर्नर सुभाष मुंद्रा यांची तातडीने इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सचे (Indiabulls Housing Finance - IBH) नूतन कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २०१८ मध्ये स्वतंत्र संचालक म्हणून IBH च्या मंडळामध्ये ते सहभागी झाले होते.

ठळक मुद्दे

  • इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (Indiabulls Housing Finance Ltd - IBHFL) सह-संस्थापक आणि अध्यक्ष समीर गेहलोत यांनी कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष पद सोडले आहे.

  • गेहलोत यांनी IBHFL ची सहायक कंपनी इंडियाबुल्स वेंचर्स लिमिटेडच्या (Indiabulls Ventures Ltd) मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer - CEO) पदाचा भार स्विकारण्यासाठी आपल्या सध्याच्या पदाचा त्याग केला आहे.

इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडबाबत (Indiabulls Housing Finance - IBH) महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यालयाचे ठिकाण: गुरुग्राम येथे IBH च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: २००५ साली IBH ची स्थापना झाली होती.

  • सेवा प्रदान कार्य: गृह कर्ज, वित्तपुरवठा आणि बँकिंग इ. सेवा IBH द्वारे पुरवण्यात येतात.