-
१५ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २०२० या कालावधीत युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयामार्फत 'फिट इंडिया फ्रीडम रन (Fit India Freedom Run)' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
१५ ऑगस्ट रोजी भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनाचे आणि २ ऑक्टोबर रोजीच्या १५१ व्या महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य साधून युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय 'फिट इंडिया फ्रीडम रन' आयोजित करत आहे.
-
कॉविड-१९ प्रोटोकॉलचे अनुसरण करत जनतेस तंदुरुस्तीला चालना देण्याचा संदेश देण्यासाठी करण्यात आलेले हे देशभरातील सर्वात मोठे आयोजन आहे.
केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
केंद्रीय मंत्री: किरेन रिजिजू हे सध्या केंद्रीय मंत्री म्हणून कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १९८२ साली क्रीडा विभाग म्हणून स्थापना झाली होती मात्र २७ मे २००० युवा कार्य व क्रीडा मंत्रालय म्हणून कार्यरत झाले.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे मुख्यालयाचे ठिकाण आहे.