• प्रसार भारतीचे (Prasar Bharati) मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शशी शेखर वेम्पती यांची 'एशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियनच्या (Asia Pacific Broadcasting Union - ABU)' उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • प्रसार भारती ही भारताची सर्वात मोठी सार्वजनिक प्रसारण संस्था म्हणून कार्यरत आहे.

  • एशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन (ABU) ही जगातील सर्वात मोठी प्रसारण संस्था म्हणून कार्यरत आहे.

प्रसार भारतीबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: २३ नोव्हेंबर १९९७ रोजी प्रसार भारतीची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे प्रसार भारतीच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

ABU बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ABU म्हणजेच Asia Pacific Broadcasting Union अर्थात आशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: क्वालालंपूर, मलेशिया हे ABU च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सध्याचे अध्यक्ष: इब्रहिम एरेन हे ABU चे सध्याचे अध्यक्ष आहेत.

  • स्थापना वर्ष: १ जुलै १९६४ रोजी ABU ची स्थापना करण्यात आली होती.