-
दूरसंचार सल्लागार इंडिया लिमिटेड (Telecommunications Consultants India Limited - TCIL) चे नूतन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (Chairman & Managing Director - CMD) म्हणून संजीव कुमार यांची नेमणूक करण्यास मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत (Appointments Committee of the Cabinet - ACC) मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या (Department of Personnel & Training - DoPT) आदेशानुसार कुमार यांना या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
-
सध्या ते महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (Mahanagar Telephone Nigam Limited - MTNL) मध्ये संचालक (तांत्रिक) म्हणून कार्यरत आहेत.
TCIL बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: TCIL म्हणजेच Telecommunications Consultants India Limited अर्थात दूरसंचार सल्लागार इंडिया लिमिटेड होय.
-
स्थापना वर्ष: १९७८ साली TCIL ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे TCIL च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.