• वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भारतीय क्रिकेटपटू अशोक दिंडाने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

ठळक मुद्दे

  • या ३६ वर्षीय वेगवान गोलंदाजाने २००५ मध्ये बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

  • तो १५ वर्षे बंगालसाठी क्रिकेट खेळला.

  • २००९ साली श्रीलंकेविरुद्ध टी - २० सामन्यामध्ये खेळताना त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

  • २०१० साली झिम्बाब्वेमध्ये त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

  • भारताकडून त्याने १३ एकदिवसीय आणि ९ टी - २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.