• भारतीय रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank of India - RBI) कार्यकारी संचालक टी. रबी शंकर यांची RBI चे चौथे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत त्यांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली आहे.

  • डेप्युटी गव्हर्नर म्हणून ते बी. पी. कानुन्गो यांचे उत्तराधिकारी ठरतील.

RBI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होय.

  • सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.