• भारत सरकारने सीमा सुरक्षा दलाचे (Border Security Force - BSF) नवे महासंचालक म्हणून श्री. राकेश अस्थाना यांची नियुक्ती केली आहे. सध्या इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (Indo-Tibet Border Police - ITBP) प्रमुख श्री. एस. एस. देसवाल यांच्याकडे यावर्षीच्या मार्चपासून BSF चा अतिरिक्त पदभार होता.

ठळक मुद्दे

  • श्री. अस्थाना सध्या नागरी उड्डयन सुरक्षा कार्यालयाचे (Bureau of Civil Aviation Security - BCAS) प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

  • सीमेवर तैनात असणाऱ्या सीमा सुरक्षा दलाचा पूर्णवेळ कार्यभार ते स्विकारतील.

BSF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: BSF म्हणजेच Border Security Force अर्थात सीमा सुरक्षा दल होय.

  • स्थापना वर्ष: १ डिसेंबर १९६५ रोजी BSF ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे BSF चे मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • ब्रीदवाक्य: 'जीवन पर्यन्त कर्तव्य' हे BSF चे ब्रीदवाक्य आहे.