-
अखिल भारतीय रेडिओ वृत्तसेवा विभागाचे माजी प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळलेल्या जयदीप भटनागर यांच्याकडे PIB च्या प्रधान महासंचालक पदाचा पदभार सुपूर्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
संघटनेचे प्रमुख म्हणून कार्यभार स्विकारण्यापूर्वी भटनागर यांनी ६ वर्षे वेगवेगळ्या विभागांमध्ये PIB मध्ये काम केले आहे.
-
कुलदीपसिंग धतवालिया यांच्याकडून ते पदभार स्विकारतील.
PIB बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: PIB म्हणजेच Press Information Bureau अर्थात प्रेस माहिती ब्यूरो होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे PIB च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९१९ मध्ये PIB ची स्थापना करण्यात आली होती.
-
जबाबदार मंत्री: प्रकाश जावडेकर हे PIB साठी जबाबदार मंत्री आहेत.