• दुष्यंत चौटाला यांची ४ वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या (Table Tennis Federation of India - TTFI) अध्यक्षपदी पुनर्निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • TTFI च्या ८४ व्या वार्षिक बैठकीत ते एकमताने निवडून आले.

  • सध्या ते हरियाणाचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.

TTFI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: TTFI म्हणजेच Table Tennis Federation of India अर्थात भारतीय टेबल टेनिस महासंघ होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे TTFI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: दुष्यंत चौटाला हे सध्या TTFI च्या अध्यक्षपदावर कार्यरत आहेत.

  • स्थापनाः १९२६ साली TTFI ची स्थापना करण्यात आली होती.