• आंतरराष्ट्रीय गोल्फ संघटनेमार्फत (International Golf Federation - IGF) अन्निका सोरेनस्टॅम यांची नूतन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • १ जानेवारी २०२१ पासून त्यांची नियुक्ती प्रभावी राहील.

  • IGF चे मावळते अध्यक्ष पीटर डॉसन आपल्या १० वर्षांच्या सेवेनंतर राजीनामा देत आहेत.

IGF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IGF म्हणजेच International Golf Federation अर्थात आंतरराष्ट्रीय गोल्फ संघटना होय.

  • स्थापना: १९५८ साली IGF ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: लॉझने, स्वित्झर्लंड हे IGF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संलग्नता: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसोबत IGF ची संलग्नता आहे.