• भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (Board of Control for Cricket in India - BCCI) विद्यमान सचिव जय शाह यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या (Asian Cricket Council - ACC) अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ACC कार्यालयात नियुक्त करण्यात येणारे ते सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत.

  • बांगलादेश क्रिकेट मंडळाचे (Bangladesh Cricket Board - BCB) प्रमुख नझमुल हुसेन यांची ते जागा घेतील.

ACC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ACC म्हणजेच Asian Cricket Council अर्थात आशियाई क्रिकेट परिषद होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: कोलंबो, श्रीलंका हे ACC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • चेअरमन: अमिताभ चौधरी हे सध्या चेअरमन पदावर कार्यरत आहेत.

  • अध्यक्ष: जय शाह हे सध्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १९८३ साली ची स्थापना करण्यात आली होती.

  • वैशिष्ट्य: आशियातील प्रादेशिक प्रशासकीय संस्था या स्वरुपात ही परिषद कार्यरत आहे.

  • सदस्यत्व: सध्या परिषदेच्या २४ सदस्य संघटना आहेत

  • ब्रीदवाक्य: 'Cricket for good' हे परिषदेचे ब्रीदवाक्य आहे.