-
जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organisation - WHO) साथीबाबतची तयारी आणि प्रतिसादासाठीच्या स्वतंत्र पॅनेलमार्फत माजी आरोग्य सचिव प्रीती सुदान यांना जगभरातील ११ जणांच्या पॅनेलचा सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
न्यूझीलंडचे माजी पंतप्रधान हेलन क्लार्क आणि लायबेरियाचे माजी अध्यक्ष एलेन जॉनसन सरलीफ या पॅनेलच्या २ प्रमुखांनी हा निर्णय घेतला आहे.
WHO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: WHO म्हणजेच World Health Organisation अर्थात जागतिक आरोग्य संघटना होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड हे WHO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: ७ एप्रिल १९४८ रोजी WHO ची स्थापना झाली होती.
-
व्यवस्थापकीय संचालक: टेड्रोस अडॅनॉम हे सध्या WHO च्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत.