-
आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांबाबतच्या भारतीय संशोधन परिषदेचे (Indian Council for Research on International Economic Relations - ICRIER) अध्यक्ष म्हणून श्री. प्रमोद भसीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
ICRIER च्या गव्हर्नर बोर्डाचे ते सध्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
-
आरोग्याशी संबंधीत बाबींच्या कारणास्तव राजीनामा देणाऱ्या इशर जज अहलुवालिया यांची ते जागा घेतील.
-
गेल्या १५ वर्षांपासून इशर या पदावर कार्यरत होत्या.
ICRIER बाबत महत्वपूर्ण माहिती
-
संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: डॉ. रजत कथुरिया हे सध्या ICRIER च्या संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा सांभाळत आहेत.
-
मुख्यालय: नवी दिल्ली येथे ICRIER चे मुख्यालय आहे.