-
टेबल टेनिस स्टार पौलोमी घटकने नुकतीच निवृत्तीची घोषणा केली आहे. २००६ मधील राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games) आणि २००० ते २००८ दरम्यान राष्ट्रकुल चँपियनशिपमध्ये (Commonwealth championships) तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
ठळक मुद्दे
-
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तिने सिडनी येथे ऑलिम्पिकमध्ये प्रथमच प्रवेश केला होता.
-
निवृत्तीच्या घोषणेनंतर पौलोमी तिचा नवरा सौम्यदीप रॉय यांच्यासोबत जून २०१९ मध्ये उद्घाटन झालेल्या त्यांच्या अकादमीमध्ये तरुण खेळाडूंना प्रशिक्षित करण्याचे कार्य पार पाडणार आहे.
पौलोमी घटकबाबत महत्वपूर्ण माहिती
-
पौलोमी ही पश्चिम बंगालची रहिवासी आहे.
-
१९९६, १९९८आणि १९९९ या ३ वर्षांमध्ये तिने कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजय प्राप्त केला आहे.
-
१९९८ ते २०१६ या कालावधी दरम्यान तिने ७ वरिष्ठ गटातील अजिंक्यपदे जिंकली होती.
विशेष उल्लखनीय क्रीडा कामगिरी
-
२००६ मध्ये SAF गेम्समध्ये महिलांच्या दुहेरीत तिने सुवर्णपदक जिंकले होते.
-
राष्ट्रकुल २००६ मध्ये तिने कांस्यपदक जिंकले होते.
-
२००७ मध्ये तिने राष्ट्रकुल चँपियनशिपमध्ये कांस्यपदक प्राप्त केले होते.
-
२०१० राष्ट्रकुलमध्ये तिने रौप्यपदक जिंकले होते.
-
आशियाई गेम्स, २०१२ मध्ये तिने क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारली होती.
टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया बाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९२६ साली टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे संस्थेचे मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्थेची संलग्नता: आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनसोबत संस्थेची आंतरराष्ट्रीय संलग्नता आहे.
-
सध्याचे अध्यक्ष: दुष्यंत चौटाला हे सध्या संस्थेच्या अध्यक्षपदावर कार्यरत आहेत.
-
सध्याचे सचिव: एम.पी. सिंग हे सध्या संस्थेच्या सचिव पदावर कार्यरत आहेत.