• 'पोर्तुगीज ग्रँड प्रिक्स (Portuguese Grand Prix) २०२०' वर लुईस हॅमिल्टनमार्फत विजयी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • पोर्तुगालच्या अल्गारवे आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित पोर्तुगीज ग्रँड प्रिक्स २०२० मध्ये लुईस हॅमिल्टनने (मर्सिडीज-ग्रेट ब्रिटन) आपली विजयी मोहोर उमटवली आहे.

  • २०२० सालची ही फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिपची १२ वी फेरी होती.

  • हॅमिल्टनचा हा मोसमातील ८ वा तर करिअरमधला ९२ वा विजय आहे.

  • दुसऱ्या क्रमांकावर वाल्टेरी बोटास (मर्सिडीज-फिनलँड) तर मॅक्स व्हर्स्टापेन (रेड बुल - नेदरलँड्स) तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.