• सार्वजनिक उपक्रम निवड मंडळामार्फत (Public Enterprises Selection Board - PESB) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या (Steel Authority of India Limited - SAIL) पुढील अध्यक्षपदी सोमा मोंडल यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्ष अनिल चौधरी यांच्यानंतर त्या पदाचा कार्यभार स्वीकारतील.

ठळक मुद्दे

  • सप्टेंबर २०१८ मध्ये मोंडाल यांनी SAIL च्या वाणिज्यिक संचालक पदाची सूत्रे हाती घेतली होती.

  • त्यापूर्वी त्या भुवनेश्वर येथील नालकोच्या (NALCO) वाणिज्यिक संचालक म्हणून कार्यरत होत्या.

  • NALCO च्या पहिल्या महिला संचालक बनण्याचा इतिहास त्यांनी रचला होता.

सेल (SAIL) बाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यालय: नवी दिल्ली येथे SAIL चे मुख्यालय आहे.

  • स्थापना: १९५४ साली SAIL ची स्थापना झाली होती.