• भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (Indian Space Research Organisation - ISRO) अध्यक्ष के. सिवन यांचा कार्यकाळ १ वर्षासाठी वाढविण्यास केंद्र सरकारमार्फत मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • के. सिवन हे जानेवारी २०२१ मध्ये सेवानिवृत्त होणार होते.

  • सध्या ते ISRO चे अध्यक्ष आणि सचिव म्हणून जानेवारी २०२२ पर्यंत काम पाहणार आहेत.

ISRO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था होय.

  • सध्याचे अध्यक्ष: के. सिवन हे सध्या ISRO च्या अध्यक्ष पदावर आहेत.

  • स्थापना वर्ष: १५ ऑगस्ट १९६९ रोजी ISRO ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: बंगळुरू, कर्नाटक हे ISRO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.