-
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमार्फत (International Olympic Committee - IOC) ब्रेकडान्सिंगला ऑलिम्पिकचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
नवीन ऑलिम्पिक प्रेक्षकांना आकर्षित करावे या मुख्य उद्देशाने IOC ने ऑलिम्पिकमधील अधिकृत प्रवेश आणि अधिकृत ऑलिम्पिक खेळ म्हणून ब्रेकडान्सिंगचे नाव नोंदवले आहे.
-
ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ब्रेकडेन्सिंगला ‘ब्रेकिंग’ म्हणून ओळखले जाईल.
-
ब्रेकिंग २०२४ च्या पॅरिस उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये पदार्पण करेल.
-
स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लाइंबिंग आणि सर्फिंग हे ३ नवीन खेळ टोकियो गेम्स २०२१ मध्ये ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करतील.
IOC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: IOC म्हणजेच International Olympic Committee अर्थात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: लॉझने, स्वित्झर्लंड हे IOC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सध्याचे अध्यक्ष: थॉमस बाख हे सध्या IOC चे अध्यक्ष आहेत.
-
स्थापना वर्ष: २३ जून १८९४ रोजी IOC ची स्थापना करण्यात आली होती.