• २०२२ सालच्या ICC महिला विश्वचषकाचे अधिकृत गाणे म्हणून न्यूझीलंडची गायिका जिन विगमोरचा ट्रॅक असलेल्या 'गर्ल गँग' ची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर स्पर्धेचे आयोजन ४ मार्च ते ३ एप्रिल २०२२ या कालावधीत न्यूझीलंडमध्ये करण्यात येणार आहे.

  • सदर विश्वचषक स्पर्धा ही कोविड - १९ च्या साथीच्या रोगामुळे १ वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

ICC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ICC म्हणजेच International Cricket Council अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद होय.

  • स्थापना वर्ष: १५ जून १९०९ रोजी ICC ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: दुबई, अरब अमिराती हे ICC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सध्याचे चेअरमन: ग्रेग बार्कले हे सध्या ICC च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत आहेत.

  • सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी: मनु सावनी हे सध्या ICC च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सांभाळत आहेत.

  • सदस्य देश: जगभरातील १०४ देश ICC चे सदस्य देश आहेत.

  • ब्रीदवाक्य: 'Cricket for good' हे ICC चे ब्रीदवाक्य आहे.