-
भारतीय क्रिकेट नियामक मंडळामार्फत (Board of Control for Cricket in India - BCCI) नवीन किट प्रायोजक आणि अधिकृत व्यापारी भागीदार म्हणून मोबाईल प्रीमियर लीग (Mobile Premier League - MPL) स्पोर्ट्स या ब्रँडशी भागीदारी जाहीर करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
भारतीय क्रिकेट संघासाठी एमपीएल स्पोर्ट्सतर्फे नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२३ या कालावधीसाठी ३ वर्षांचा करार करण्यात आला आहे.
-
MPL स्पोर्ट्स BCCI च्या सहकार्याने भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौर्यापासून कार्यरत राहील.
BCCI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: BCCI म्हणजेच Board of Control for Cricket in India अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ होय.
-
अध्यक्ष: सौरव गांगुली हे सध्या BCCI अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
-
सचिव: जय शाह हे सध्या BCCI सचिव म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे BCCI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९२८ साली BCCI ची स्थापना करण्यात आली होती.
-
पुरुष संघ प्रशिक्षक: रवी शास्त्री हे सध्या पुरुष संघ प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
-
महिला संघ प्रशिक्षक: डब्ल्यू. व्ही. रमण हे सध्या महिला संघ प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
MPL Sports बाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: २०१८ साली MPL Sports ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: बेंगळुरू, कर्नाटक हे MPL Sports च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: साई श्रीनिवास किरण जी हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.