-
रशियन बॅडमिंटनपटू निकीता खाकीमोव्हवर बॅडमिंटन जागतिक महासंघाकडून (Badminton World Federation - BWF) काही आरोपांमुळे ५ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
२०२० च्या युरोपियन टीम चँपियनशिप्समध्ये (European Team Championships) कांस्यपदक जिंकणार्या रशियन पुरुष संघात खाकीमोव्हचा सहभाग होता.
-
खाकीमोव्हकडून BWF च्या अखंडतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.
BWF बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: BWF म्हणजेच Badminton World Federation अर्थात बॅडमिंटन जागतिक महासंघ होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: क्वालालंपूर, मलेशिया हे BWF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९३४ साली BWF ची स्थापना करण्यात आली होती.
-
अध्यक्ष: पूल-एरिक होयर लार्सन हे BWF चे सध्याचे अध्यक्ष आहेत.