-
सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश अरुण कुमार मिश्रा यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (National Human Rights Commission - NHRC) अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर निवड समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राज्यसभा उपाध्यक्ष हरिवंश, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसेच राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांचा समावेश होता.
NHRC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: NHRC म्हणजेच National Human Rights Commission अर्थात राष्ट्रीय मानवाधिकार आयोग होय.
-
स्थापना वर्ष: १२ ऑक्टोबर १९९३ रोजी NHRC ची स्थापना करण्यात आली होती.
-
सध्याचे अध्यक्ष: अरुण कुमार मिश्रा हे सध्या NHRC च्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे NHRC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.