• राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (National Human Rights Commission - NHRC) कार्यकारी अध्यक्ष पदावर प्रफुल्ल चंद्र पंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती पंत यांना यापूर्वी NHRC च्या सदस्य पदावर नियुक्त करण्यात आले होते.

  • भारताचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती एच. एल. दत्तू यांनी २ डिसेंबर २०२० रोजी कार्यकाळ पूर्ण केल्यापासून अध्यक्षपद रिक्त होते.

NHRC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: NHRC म्हणजेच National Human Rights Commission अर्थात राष्ट्रीय मानवाधिकार आयोग होय.

  • स्थापना वर्ष: १२ ऑक्टोबर १९९३ रोजी NHRC ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे NHRC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.