-
केंद्रीय अर्थ मंत्रालयाअंतर्गत तरुण बजाज यांची नूतन महसूल सचिव म्हणून नियुक्ती करण्यास केंद्र सरकारमार्फत मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
बजाज हे १९८८ च्या तुकडीचे हरियाणा-केडरचे आयएएस अधिकारी आहेत.
-
एप्रिल २०२० पासून ते आर्थिक व्यवहार सचिव पदावर कार्यरत होते.
-
कर्नाटक-केडरच्या १९८७ बॅचचे आयएएस अधिकारी असणाऱ्या अजय सेठ यांची आर्थिक व्यवहार सचिव पदावर नियुक्ती करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
-
बजाज यांच्या जागी ते काम पाहतील.