-
कमलेश कुमार पंत यांची नुकतीच 'राष्ट्रीय औषधी किंमत प्राधिकरणाच्या (National Pharmaceutical Pricing Authority - NPPA)' नूतन अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
पंत हे हिमाचल प्रदेश केडरचे १९९३ च्या तुकडीचे IAS अधिकारी आहेत.
-
ते शुभ्रा सिंग यांच्याकडून कार्यभार घेतील.
NPPA बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: NPPA म्हणजेच National Pharmaceutical Pricing Authority अर्थात 'राष्ट्रीय औषधनिर्मिती प्राधिकरण' होय.
-
स्थापना वर्ष: २९ ऑगस्ट १९९७ रोजी NPPA ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे NPPA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.