-
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत स्वामीनाथन जानकीरामन आणि अस्विनीकुमार तिवारी यांची स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India - SBI) नूतन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यास ३ वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
यापूर्वी स्वामीनाथन जानकीरामन SBI चे उपव्यवस्थापकीय संचालक (फायनान्स) म्हणून तर अस्विनीकुमार तिवारी हे SBI कार्डचे व्यवस्थापकीय संचालक आणिमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.
-
सध्या SBI मध्ये अध्यक्ष आणि ४ व्यवस्थापकीय संचालक कार्यरत आहेत.
-
दिनेश कुमार खारा हे बँकेच्या विद्यमान अध्यक्षपदावर कार्यरत आहेत.
-
सी. एस. सेट्टी आणि अश्वनी भाटिया हे बँकेचे अन्य २ व्यवस्थापकीय संचालक आहेत.
-
ऑक्टोबर २०२० पासून ही दोन्ही पदे रिक्त होती.
SBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: SBI म्हणजेच State Bank of India अर्थात भारतीय स्टेट बँक होय.
-
अध्यक्षः दिनेश कुमार खारा हे सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १ जुलै १९५५ रोजी बँकेची स्थापना झाली होती.
-
संस्थेचे स्वरूप: सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांतर्गत येणारी संस्था असे बँकेचे स्वरूप आहे.
-
सेवा प्रदान: बँकिंग व आर्थिक सेवा SBI मार्फत पुरवल्या जातात.