• भारत सरकारमार्फत नुकतीच 'भारतीय निर्यात-आयात बँकेच्या (Export-Import Bank of India - EXIM Bank)' नूतन व्यवस्थापकीय संचालक पदावर हर्ष भूपेंद्र बांगरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • बांगरी हे यापूर्वी EXIM बँकेत उपव्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते.

  • डेव्हिड रास्किन्हा यांची ते जागा घेतील.

EXIM बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: EXIM म्हणजेच 'Export-Import Bank of India' अर्थात 'भारतीय निर्यात-आयात बँक' होय.

  • स्थापना वर्ष: १ जानेवारी १९८२ रोजी EXIM बँकेची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे EXIM बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.