-
एस. कृष्णन यांची पंजाब आणि सिंध बँकेचे (Punjab & Sind Bank) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (Managing Director and Chief Executive Officer) म्हणून नियुक्ती करण्यास मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत (Appointments Committee of the Cabinet - ACC) मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
कृष्णन हे एस. हरिशंकर यांची जागा घेतील.
-
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत एस. हरिशंकर यांना स्विकृतीच्या अधिसूचनेच्या तारखेपासून स्वेच्छानिवृत्ती घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
-
एस. कृष्णन हे या बढतीपूर्वी कॅनरा बँकेत कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते.
पंजाब अँड सिंध बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९०८ साली पंजाब अँड सिंध बँकेची स्थापना झाली होती.
-
कार्यकारी अध्यक्ष: चरणसिंग हे सध्या कार्यकारी अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
बँकैची टॅगलाईनः 'Where Service is a Way of Life' ही बँकैची टॅगलाईन आहे.