-
SBI म्युच्युअल फंड (Mutual Fund - MF) च्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर श्री. विनय टोंसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते अश्वनी भाटीया यांची जागा घेतील ज्यांची नुकतीच स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (Managing Director - MD) म्हणून नियुक्ती झाली आहे.
ठळक मुद्दे
-
१९८८ सालामध्ये टोंसे SBI मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून रुजू झाले होते.
-
भारत आणि परदेशामध्ये विविध ठिकाणी त्यांनी काम केले आहे.
-
भारतीय स्टेट बँकेमधील जवळपास ३२ वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक बाबींमध्ये समृद्ध अनुभव प्राप्त केला आहे.
SBI म्युच्युअल फंडाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापनाः १९८७ साली SBI म्युच्युअल फंडाची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे SBI म्युच्युअल फंडाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्था विशेष: भारतीय स्टेट बँकेद्वारे प्रायोजित मालमत्ता व्यवस्थापन कंपनी म्हणून ही संस्था कार्यरत आहे.