• भारतीय क्रिकेट नियामक मंडळामार्फत (Board of Control for Cricket in India - BCCI) भारताच्या सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूंपैकी एक असणाऱ्या नीतू डेविड यांची भारतीय महिला निवड समितीच्या नूतन प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • महिला निवड समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

  • नव्याने निवडण्यात आलेल्या समितीच्या अन्य सदस्यांमध्ये आरती वैद्य, मिठू मुखर्जी, रेणू मार्गरेट आणि व्ही. कल्पना यांचा समावेश आहे.

  • नीतू डेविड यांच्या नेतृत्वातील सदर समितीची नियुक्ती ४ वर्षांसाठी करण्यात आली आहे.

BCCI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: BCCI म्हणजेच Board of Control for Cricket in India अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ होय.

  • अध्यक्ष: सौरव गांगुली हे सध्या BCCI च्या अध्यक्ष पदावर आहेत.

  • सचिव: जय शाह हे सध्या सचिव पदावर आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र येथे BCCI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १९२८ साली BCCI ची स्थापना झाली होती.