-
राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांच्यामार्फत नुकतीच उत्तराखंड, पंजाब, तमिळनाडू आणि नागालँडमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
उत्तराखंड राज्याच्या राज्यपाल पदावर नुकतेच लष्कर उपप्रमुख पदावरून निवृत्त झालेल्या लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
इतर प्रमुख नियुक्त्या
-
पंजाब: तमिळनाडू राज्याचे सध्याचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची पंजाबचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
-
तमिळनाडू: आर. एन. रवी जे सध्या नागालँडचे राज्यपाल आहेत त्यांची तमिळनाडूच्या राज्यपाल पदावर नेमणूक करण्यात आली आहे.
-
नागालँड: आसामचे राज्यपाल प्राध्यापक जगदीश मुखी यांची नागालँडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.