-
राजीव कुमार यांची भारत सरकारमार्फत नूतन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
अशोक लवासा यांच्यानंतर ते कार्यभार सांभाळतील.
-
राजीव कुमार हे झारखंड केडरमधील १९८४ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
-
जुलै २०१९ मध्ये त्यांना वित्त सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
भारतीय निवडणूक आयोगाबाबत (Election Commission of India - ECI) महत्वपूर्ण माहिती
-
मुख्य निवडणूक आयुक्त: सुनील अरोरा हे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
स्थापना वर्ष: २५ जानेवारी १९५० रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.