-
लेफ्टनंट जनरल श्री. राजीव चौधरी यांची सीमा रस्ते संघटनेच्या (Border Roads Organisation - BRO) २७ व्या नूतन महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
चौधरी यांची नियुक्ती १ डिसेंबर २०२० पासून प्रभावी आहे.
-
नियुक्तीनंतर लेफ्टनंट जनरल चौधरी हे लेफ्टनंट जनरल हरपालसिंग यांची जागा घेतील.
-
हरपालसिंग यांना भारतीय लष्कराच्या नूतन मुख्य अभियंता (Engineer-in-Chief) पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
BRO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: BRO म्हणजेच Border Roads Organisation अर्थात सीमा रस्ते संघटना होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे BRO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: ७ मे १९६० रोजी BRO ची स्थापना करण्यात आली होती.
-
संस्थापक: जवाहरलाल नेहरू हे BRO चे संस्थापक आहेत.
-
सेवा प्रदान प्रदेश: भारत, अफगाणिस्तान, भूतान, नेपाळ आणि म्यानमार या प्रदेशांना BRO मार्फत सेवा प्रदान करण्यात येते.
-
संस्थेचे ब्रीदवाक्य: ' श्रमेन सर्वम साध्यम' हे BRO चे ब्रीदवाक्य आहे.