-
आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या (International Solar Alliance - ISA) नूतन महासंचालक पदावर डॉ. अजय माथूर यांची निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
२०१५ मध्ये ISA ची स्थापना झाल्यापासून महासंचालक पदावर कार्यरत असलेल्या श्री. उपेंद्र त्रिपाठी यांची जागा डॉ. माथूर घेतील.
ISA बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ISA म्हणजेच International Solar Alliance अर्थात आंतरराष्ट्रीय सौर आघाडी होय.
-
स्थापना वर्ष: २०१५ मध्ये ISA ची स्थापना करण्यात आली होती.
-
स्थापनेचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स येथे ISA ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: गुरुग्राम, हरियाणा हे ISA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
महासंचालक: अजय माथूर हे सध्या महासंचालक पदावर विराजमान आहेत.