-
हेमंत खत्री यांनी नुकताच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (Hindustan Shipyard Ltd - HSL) संरक्षण जहाज बांधणीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्विकारला आहे.
ठळक मुद्दे
-
निवृत्त रीअर अॅडमिरल एल. व्ही. सरट बाबू यांची ते जागा घेतील.
-
हेमंत खत्री यापूर्वी HSL मध्ये धोरणात्मक प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते.
-
२ मे २०२० रोजी त्यांना मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत मान्यता देण्यात आली होती.
हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडबाबत (Hindustan Shipyard Ltd - HSL) महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९४१ साली हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम हे HSL च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.