-
माजी संशोधन व विश्लेषण शाखेचे (Research and Analysis Wing - RAW) प्रमुख असणाऱ्या श्री. अनिल धस्माना यांची राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेचे (National Technical Research Organisation - NTRO) नूतन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
श्री. धस्माना यांनी माजी अधिकारी सतीश झा यांच्या जागी स्थान मिळवले आहे.
-
१९८१ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असणारे धस्माना फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या बालाकोट हवाई हल्ल्याचे मुख्य नियोजक म्हणून प्रसिद्ध आहेत.
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेबद्दल (National Technical Research Organisation - NTRO) महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: २००४ साली मध्ये NTRO ची स्थापना करण्यात आली होती.
-
संस्थेचे ब्रीदवाक्य: 'आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः' हे NTRO चे ब्रीदवाक्य आहे.
-
संस्थेचे वैशिष्ट्य: सदर संस्था ही पंतप्रधानांच्या कार्यालयातील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या अधीन असलेली तांत्रिक बुद्धिमत्ता संस्था आहे.